Homeकोल्हापूर शहर /जिल्हाजिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षातील पदाधिकारी...

जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) गटात भव्य पक्षप्रवेश

कागल ( एम.डी. कांबळे )दि.,०७ : पक्षाच्या विचारसरणीवर आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहीत संजय काळे. नंदकुमार कांबळे. प्रशांत मोरे. आकाश लिगाडा. जिवंन कोकाटे. आशिर्वाद पोवार. विजय कांबळे. हमिद शेख. विश्वास घोसरवाडे. सचिन सातकर. नियाज शेख. समिर शेख. विजय कांबळे.प्रशांत कूभार. फिरोज शेख. ईस्तेफाक मिस्त्री. आजम पठान. अतिश लोखंडे हे सर्व मान्यवर आता जनसेवेच्या कार्यात आमच्यासोबत सक्रिय सहभागी झाले या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करुन अभिनंदन केले.

तळागाळात आणि मनामनात रुजलेल्या रिपब्लिकन पक्षात पक्षप्रवेश ही अखंडपणे सुरू असणारी प्रक्रिया आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच पक्ष मोठा होत असतो.पक्ष बळकटीसाठी व अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते यापुढेही असेच निष्ठेने कार्य करत राहतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी या प्रवेशादरम्यान व्यक्त केला. हा पक्ष प्रवेश घडवुन आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडी शहराध्यक्ष कीरण निकाळजे यांनी विशेष प्रयत्न केले.आज देशात व राज्यात रिपब्लिकन पक्षाची संघटना मजबुतीने काम करीत आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले ज्या प्रकारे देशातील पीडित वंचित लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन काम करीत आहेत, त्यावर देशातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये आश्वासक वतावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर मधील सर्वसामान्यांचा विश्वास रिपब्लिकन पक्षावर वाढला, असून पक्ष संघटनेत इतर पक्षातील अनेक चांगले पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत, संघर्षाच्या काळात रिपब्लिकन पक्षा सोबत उभा राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यात न्याय नक्कीच मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प करूयात. या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, युवा शहराध्यक्ष कीरण निकाळजे , जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, महीला अध्यक्षा नंदाताई भास्कर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे, कार्याअध्यक्ष राहूल कांबळे, प्रज्योत सुर्यवंशी यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular