Homeकोल्हापूर शहर /जिल्हाशिक्षकांच्या गणेश विसर्जनाच्या कामगिरी रद्द करा :शिक्षक संघटना कृती समितीची मागणी

शिक्षकांच्या गणेश विसर्जनाच्या कामगिरी रद्द करा :शिक्षक संघटना कृती समितीची मागणी

◾कोल्हापूर. दि.३०. कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर शहरातील मनपा शाळा, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील शिक्षकांच्या घरगुती गणपती विसर्जन व सार्वजनिक गणपती विसर्जन करिता कामगिरी काढलेल्या आहेत. सदर कामगिरी रद्द करावी अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका मनपा व खाजगी शाळा कृती समितीच्या वतीने महानगरपालिका प्रशासक यांच्याकडे केलेली आहे. ही कामगिरी रद्द न केल्यास सदर दिवशी कोणीही शिक्षक कामावर हजर राहणार नाही असेही कळविले आहे. याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी व शिक्षकांना असैक्षणिक कामे लावू नयेत अशी कृती समितीची मागणी आहे.

महाराष्ट्र शासनाने 23 ऑगस्ट 2024 रोजी शासन आदेश काढून शैक्षणिक कामे व अशैक्षणिक कामे यांचे वर्गीकरण करून. शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त लावलेली कामे ही अशैक्षणिक कामे आहेत आणि अशी अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत असे स्पष्टपणे कळविलेले आहे. असे असतानाही शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून सातत्याने शिक्षकांना वेगळ्या प्रकारची कामे लावली जात आहेत . त्याचा परिणाम अध्यापनावर व शाळेमध्ये चाललेल्या विविध उपक्रमावर होतो. मूळातच सध्या शाळांच्यामध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असलेने शिक्षकांच्याकडे बहुवर्ग असूनही शिक्षक अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत . तशातच सातत्याने नियमबाह्य अशा विविध कामगिरी काढल्या जात आहेत.त्यामुळे शिक्षकांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

शिक्षकांची कामगिरी रद्द करून पर्यायी व्यवस्था करावी असे कृती समितीच्या वतीने महापालिका प्रशासनाला कळविण्यात आलेले आहे. अशी माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याअध्यक्ष भरत रसाळे व आयफेटोचे महासचिव सुधाकर सावंत यांनी दिली. यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई, शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, महासंघाचे सचिव राजेंद्र कोरे, पुरोगामी संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप माने, शिक्षक संघाचे सल्लागार नामदेव वाघ, शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, उत्तम कुंभार खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव शिवाजी भोसले, शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,स्नेहल रेळेकर व मोईद्दीन कमते आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular