कागल : ‘श्री’ बासुंदी चहा या नव्या आणि वेगळ्या संकल्पनेच्या शॉपचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. पारंपरिक चहाला एक नवे परिमाण देणारा हा बासुंदी चहा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहिते , उपाध्यक्ष तानाजी सोनाळकर, कागल तालुका संघटक जयवंत हळदिकर, बच्चन कांबळे ,नितिन गांधीनगरकर , संतोष चौगुले आदी अनेक मान्यवर, चहा प्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.