कोल्हापूर माझा (एम.डी.कांबळे )दि.१५ : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त वाळवा येथे त्यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करत दर्शन घेतले. वंदन करीत आदरांजली वाहिली !या थोर विभूतींनी आयुष्यभर सामाजिक न्याय, क्रांतिकारक विचार, आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी झिजवले. नागनाथअण्णांचे क्रांतिकारी कार्य आणि कुसुमताईंचे मोलाचे योगदान हे आजही समाजासाठी प्रेरणास्थान आहे. स्मृतीस्थळी उभं राहून त्या मातीतून उमललेल्या संघर्षाची आणि मूल्यांची जाणीव झाली.सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत अशा प्रेरणादायी जीवनांचे स्मरण हे नवचैतन्य देणारे आहे.

वाळवा या गावामधील ग्रामपंचायत मध्ये जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी सदिच्छा भेट दिली. सरपंच संदेश कांबळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य आयोग पाशा पटेल (साहेब),संस्थापक संचालक, चाणक्य मंडल परिवार, पुणे अविनाश धर्माधिकारी (IAS), वैभव काका नायकवडी,शिवाजीराव काळूंगे आर.स.चोपडे सर , रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व हुतात्मा संकुलातील अण्णांच्यावरती प्रेम करणारे शेतकरी,जेष्ठ तरुण मंडळी शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षिका ,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.