▪️कोल्हापूर दि ०१ : ” आपले विद्यालय आपला अभिमान ” हा उपक्रम संस्कारक्षम व प्रेरणादायी असून जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनांच्या शाळांनी हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी केले.” आपले विद्यालय,आपला अभिमान ” या उपक्रमाच्या संकल्प पत्राचे अनावरण वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी के.डी.सी.सी. संचालक भैय्या माने होते.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या वतीने देशातील 27 हून अधिक राज्यांमध्ये ” हमारा विद्यालय, हमारा अभिमान ” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये देशातील पाच लाखाहून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ सलग्न संघटना असून महासंघाच्या वतीने राज्यभरातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या संकल्प पत्राचे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद मधील अधीक्षक उदय सरनाईक, शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ, तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार यांच्या हस्ते ही अनावरण करण्यात आले.
हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी राज्याचे अवर सचिव अ.अ.कुलकर्णी तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शासन आदेशाद्वारे हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राबवण्याबाबतचे शासनादेश पारित केले आहेत. तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम शाळांमध्ये राबवण्याबाबत परिपत्रक काढण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्राव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन राज्य सचिव राजेंद्र कोरे, सल्लागार एम.डी.पाटील, विभागीय सचिव राजाराम संकपाळ, विभागीय उपाध्यक्ष दस्तगीर मुजावर, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, जिल्हा महिला कार्याध्यक्ष मिनाज मुल्ला,जिल्हा कार्याध्यक्ष धीरज पारधी, जिल्हा उपाध्यक्ष, विलास बोरचाटे, जिल्हा संघटक संदीप डवंग, कैलास भोईटे, शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण, शहर उपाध्यक्ष भगवान खिरारी, धनंजय शिंदे, सहसचिव संदीप पिष्टे, शहर संघटक पिराजी बामणे, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर, पांडुरंग जाधव, अजित मोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.