Homeमहाराष्ट्र राज्यTET च्या जाचक अटीतून महाराष्ट्रातील शिक्षकांना मुक्त करणार : ना.प्रकाश आबिटकर

TET च्या जाचक अटीतून महाराष्ट्रातील शिक्षकांना मुक्त करणार : ना.प्रकाश आबिटकर

कोल्हापूर दि. १४ : राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोल्हापूरच्या वतीने माननीय नामदार प्रकाशरावजी आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा २०१३ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वरती अन्याय करणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती सखोल चर्चा करून यातून सर्व शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत सवलत मिळवून देणार, आपण कोणीही घाबरून जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकार आपल्या बाजूने उभे राहिल.

निवेदनात खालील आशय होता :- राज्यातील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी निर्णय दिला असून ज्यांना सेवेत पाच वर्षापेक्षा कमी कालावधी आहे त्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यातून सूट देतानाच पदोन्नतीसाठी मात्र परीक्षा अनिवार्य केली आहे. तसेच पाच वर्षापेक्षा अधिक सेवा असणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन घातले असून; परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केंद्र शासनाने वेळोवेळी विहित केली शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करूनच आणि निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण शिक्षक सेवेत आले आहे. शासनाच्या आजवरच्या TET बाबतच्या शासन निर्णयात २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET उत्तीर्ण करण्याचे कुठेही आदेश नाहीत.

मात्र मा. न्यायालयाच्या निर्णयाने लक्षावधी शिक्षक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. याबाबत शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या संबंधाने संरक्षण मिळावे यासाठी “महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती” ने राज्य शासनाकडे – (१) मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची (२) प्रभावित होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सामाजिक, मानवीय दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेण्याची मागणी संदर्भित निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकरआजरा तालुक्यातून आलेले शिक्षक त्यामध्ये पुणे विभागीय संपर्क प्रमुख सुनील शिंदे, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके, एकनाथ गिलबिले ,बळीराम तानवडे, एकनाथ आजगेकर ,सुभाष नाईक ,सदाशिव दिवेकर , अनुष्का गोवेकर,अनिल गोवेकर इत्यादी शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.कागल तालुका अध्यक्ष श्री अरविंद पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री बा ना चव्हान, श्री डि एम चव्हाण श्री अशोक मगर, श्री शिवाजी काटकर, श्री धनाजी पाटील, श्री आनंदा केसरकर,श्री विक्रम कुभार,श्री दयानंद डवरी, श्री संदिप शारबिंद्रे भुदरगड तालुका विनायक चौगले सर, तुकाराम मातले सर, शांताराम कोदले सर, मारुती नांदेकर सर ,सुनील मोरे सर , आनंदराव राणे सर , आनंदा पाटील सर, नरेंद्र भाटले सर, महेश लाड सर, चेतन डवरी दयानंद डवरी, बाबासो कांबळे सर, मनोहर भाट सर, अर्जुन पाटील सर, संभाजी गुरव सर राधानगरी टी एस पाटील, संतोष पाटील रामचंद्र गोसावी संजय जितकर मिलिंद तोडकर, विलास मुसळे दिलीप चौगुले करवीर प्रभाकर कमलकर हरिदास वर्णे,शरद केनवडे ,बाबा धुमाळ उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular