Homeराजकीयकागल तालुक्यात नव्याने होणारा बानगे मतदार संघ रद्द करून म्हाकवे मतदारसंघ करण्याच्या...

कागल तालुक्यात नव्याने होणारा बानगे मतदार संघ रद्द करून म्हाकवे मतदारसंघ करण्याच्या अमरीश घाटगे यांच्या हालचाली

कागल ( एम. डी. कांबळे यांचेकडून ): घाटगे याचा पारंपरिक सिद्धनेर्ली मतदारसंघ यावेळी आरक्षित असल्याने तिथं उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात घेऊन, सध्या नवीन तयार झालेला बानगे मतदारसंघ हा अमरीश घाटगे व त्याची पत्नी या मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत ,पण बाणगे मतदारसंघातील सध्याचे वातावरण पाहता हा मतदारसंघ त्याच्या फारसा सोयीचा नाही ,त्यात या मतदारसंघात बानगे गाव हे सर्वात मोठे गाव असून तेथील जनतेचा विरोध पाहता, अमरिष घाटगे यांचे या मतदार संघावर वर्चस्व राहणे अवघड आहे ,यामुळे त्यांनी म्हाकवे गाव या मतदारसंघात घालण्याचा घात घातला आहे पण याच मतदारसंघातील पिंपळगाव बुद्रुक व चौंडाळ हे गाव सिद्धनेर्ली मतदारसंघात जोडत आहेत,

सध्या म्हाकवे गाव भौगोलिक दृष्ट्या संलग्न आहे हे कारण ते सांगत आहेत पण याच नियमानुसार पिंपळगाव बुद्रुक व चौडाळ संलग्न गावे काढून टाकून त्या दोन्ही गावावर अन्याय करत आहेत ,म्हाकावे हे गाव या यामध्ये समाविष्ट करून या मतदारसंघाला असणारे बाणगे मतदारसंघ हे नाव कमी करून एक प्रकारे बानगे गावचा अपमान करत आहेत पण या बाणगे पिपळगाव बु चौडाळ या गावानी श्री अमरीश घाटगे यांचे वडील मा आ संजयबाबा घाटगे व अमरीश घाटगे यांची अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठराखण केली आहे हे सर्व विसरून,आपल्या कायमच्या राजकीय स्वार्थ साधण्याचा उपदव्यापी सवयीप्रमाणे ते बाणगे पिंपळगाव बुद्रुक व चौंडाळ या गावावर अन्याय करत आहेत तरी सर्व बाणगे ग्रामस्थ या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व भविष्यात सौ व श्री अमरीश घाटगे याना या मतदारसंघात याची राजकीय किंमत मोजवी लागेल अशी तीव्र भावना बानगे,पिपळगाव बु चौडाळ येथील मतदार व ग्रामस्थातून व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES

Most Popular