कागल ( एम.डी.कांबळे )दि.२६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने कामगार आघाडीच्या पदवाटपाचा भव्य सोहळा कागल येथील रेस्ट हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटीळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमात करवीर तालुका कामगार आघाडी अध्यक्षपदी मानसिंग संकपाळ*, उपाध्यक्षपदी प्रदीप ढाले यांची निवड झाली, तसेच विविध नवीन चेहऱ्यांना संघटन कार्याची संधी मिळाली. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कामगारांच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाची गरज, सामाजिक न्यायाची चळवळ आणि पक्ष विस्ताराचा ध्यास यावर भर दिला. त्यांनी नव्या नेतृत्वाला एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटीळे यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील काळात कामगार आघाडीच्या कार्याला अधिक दिशा व गती देण्याचे आवाहन केले. राजेंद्र ढाले यावेळी तालुका सरचिटणीस सचिन मोहीते, श्रीकांत मालेकर, नितीन कांबळे, गजेंद्र कांबळे, अजित भोसले तसेच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला व युवक आघाडीचे सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भव्य सोहळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कामगार चळवळीला नव्या उत्साहाने आणि नेतृत्वाने गती मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.