हातकणंगले (प्रतिनिधी): तालुका हातकणंगले येथील एमआयडीसीमध्ये उद्योगपती संदिप कांबळे यांच्या नूतन कारखान्याचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध मान्यवर, उद्योगजगतातील प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी कारखान्याला सदिच्छा भेट देत उद्योगपती संदिप कांबळे यांना पुढील उद्योगवृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांनी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला..या शुभ प्रसंगी जिल्हाध्यक्ष कांबळे दादा यांनी नव्या उद्योगामुळे स्थानिकांना रोजगार, औद्योगिक प्रगती आणि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
उद्योगपती संदिप कांबळे यांनी सर्व पाहुण्यांचे मन:पूर्वक आभार मानत उद्योगाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी जपली जाईल, असे सांगितले.कारखान्याच्या उद्घाटनामुळे हातकणंगले परिसरात औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक तरुणांसाठीही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी मा.जी. जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे,रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस सचिन मोहीते, अमर कांबळे, अतिश शिंगे, महेंद्र कांबळे, अण्णासो कांबळे, अनिल आवळे , सागर कांबळे, प्रवीण भाटनवडे , नितिन राऊत यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..