कोल्टापूर दि 05 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेस प्राथमिक शिक्षकांची बैठके पथकास नियुक्ती करू नये अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली.
कोरोना आजाराच्या साथीनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कालावधीमध्ये प्राथमिक शिक्षकांची सदर परीक्षा केंद्रांवर बैठे पथक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी आवश्यक सर्व शासकीय यंत्रणेचे नियोजन आपल्या मार्फत करण्यात येते. या वर्षीपासून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात येत आहे.
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये संदर्भीय याचिका क्रमांकानुसार सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने रिटपिटीशन दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेमध्ये शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या बैठे पथकाच्या कामाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या याचिकेवर यापूर्वी सुनावणी होऊन शिक्षकांना अशा प्रकारची कामे न देण्याबाबत मा. उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहेत. तसेच सदर परिक्षा केंद्रांवर प्राथमिक शिक्षकांची बैठे पथक म्हणून नियुक्ती केली जाते. या बैठे पथकास विशेष असे कोणतेही काम असत नाही. त्यामुळे सदर शिक्षकाचा शाळेतील अध्यापनाचा वेळ वाया जातो.तरी प्राथमिक शिक्षकांना परीक्षा केंद्रावरती बैठे पथकात नियुक्ती न करण्या बाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक समितीचे नेते सुधाकर सावंत, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे शिवाजी भोसले,सर्जेराव नाईक, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे दिलीप माने सातापा पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे संदीप सुतार इत्यादी उपस्थित होते.











Users Today : 19
Total Users : 12793
Views Today : 62
Total views : 17176