Homeशैक्षणिकशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती,मान्यता, शालार्थ आयडीची होणार तपासणी...बोगस कागदपत्रे आढळल्यास होणार...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती,मान्यता, शालार्थ आयडीची होणार तपासणी…बोगस कागदपत्रे आढळल्यास होणार फौजदारी

कोल्हापूर माझा विशेषवृत्त

कोल्हापूर दि. 08 : नागपूर मध्ये झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती व शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी राज्य शासनाकडून विशेष चौकशी समिती (एसआयटी ) ची स्थापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १८ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या काळातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीचा निर्णय घेतला आहे.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रंगीत छायाचित्रे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य, मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. त्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीतील बोगसगिरी समोर येईल, असा हेतू आहे. कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीत अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सर्व कागदपत्रे डिजिटलाइज केली जाणार आहेत. ७ जुलै २०२५ पूर्वी दिलेल्या सर्व शालार्थ आयडी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०१६ ते ७ जुलै २०२५ या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, खासगी व्यवस्थापनाच्या नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रुजू अहवाल अशी कागदपत्रे त्या पोर्टलवर संबंधित शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अपलोड करायची आहेत.

दरम्यान, ७ नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या काळातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खासगी व्यवस्थापनाचे आदेश, कर्मचारी रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडी आवक जावक क्रमांक दिनांक सह ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. यातून ज्या शिक्षकांच्या कागदपत्रांत तफावत किंवा बनावटगिरी आढळेल, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते.

७ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या काळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता, नियुक्ती आदेश व शालार्थ आयडी अशी सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यावेळी बोगस कागदपत्रांद्वारे कोणी वेतन घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सप्टेंबरपासून प्रत्येकाची कागदपत्रे तपासणी सुरू होईल.

RELATED ARTICLES

Most Popular