Homeसामाजिकसर्किट बेंच लढ्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार...

सर्किट बेंच लढ्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर,( एम.डी.कांबळे ) ता. ८ ऑगस्ट: कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे यासाठी दीर्घकाळ लढा दिलेला आहे. या लढ्यात ‘दैनिक पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव* यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक व प्रभावी योगदानाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीचा जोरदार आवाज सर्वप्रथम डॉ. जाधव यांनी १४ मे १९७४ रोजी ‘दैनिक पुढारी’च्या अग्रलेखातून उठवला होता. सर्किट बेंचसाठी अग्रलेख लिहिणारे ‘पुढारी’ हे त्या काळातले एकमेव दैनिक होते. यानंतर त्यांनी केवळ पत्रकारितेपुरतेच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवला, शासन दरबारी पाठपुरावा केला व जनजागृती घडवून आणली.हा लढा केवळ वृत्तपत्रातील शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो कोल्हापूरच्या जनतेच्या हक्काचा लढा बनवण्यासाठी डॉ. जाधव यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली, असे यावेळी बोलताना कांबळे यांनी नमूद केले.

कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे ही केवळ स्थानिक मागणी नव्हे, तर न्यायाच्या अधिक सुलभ व सुलभ उपलब्धतेसाठीचा लढा होता, याचे भान जाधव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला करून दिले.या सत्कार प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने डॉ. जाधव यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान म्हणजे कोल्हापुरातील जनतेतर्फे दिलेले कृतज्ञतेचे प्रतीक असून, न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारितेचा गौरव आहे, असे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले

.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी ‌.आर.कांबळे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाईकर, जिल्हा संघटक राजेंद्र टिपकुरलीकर,युवक आघाडी अध्यक्ष अविनाश शिंदे, कामगार आघाडी सरचिटणीस गुणवंत नागटिळे, कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ , कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखरजी कोरे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, शहर उपाध्यक्ष विकी कांबळे, कार्याध्यक्ष राहुल कांबळे, अतुल कांबळे , यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular