Homeकोल्हापूर शहर /जिल्हाना.हसन मुश्रीफ यांनी घेतले परमपूज्य श्री 108 विदेह सागर महाराज यांचे आशीर्वाद

ना.हसन मुश्रीफ यांनी घेतले परमपूज्य श्री 108 विदेह सागर महाराज यांचे आशीर्वाद

गिजवणे, ता. गडहिंग्लज : येथील सुरू असलेल्या परमपूज्य श्री 108 विदेह सागर महाराज यांच्या चातुर्मास पर्वास शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी विशेष भेट दिली व महाराजांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी मंत्री ना. मुश्रीफ यांनी महाराजांच्या आध्यात्मिक कार्याची स्तुती करत सांगितले की, “संत-महात्म्यांच्या उपस्थितीमुळे समाजात सकारात्मकता, शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आपण सर्वांनी योग्य दिशा घ्यावी.”

यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, गडहिंग्लज तालुका संघाचे उपाध्यक्ष रमेश पाटील, समाजाचे अध्यक्ष धनराज कमते, अभय कमते, महावीर पाटील, संदीप पाटील, कुमार पाटील बाबगोंड पाटील यांच्यासह श्रावक, श्राविका उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular