कागल ( प्रतिनिधी एम.डी.कांबळे )दि.१७ : तालुक्यातील मागासवर्गीय दलित समाजातील प्रलंबित प्रश्नासाठी राधानगरी कागल चे उपविभागीय अधिकारी(प्रांत)मा.प्रसाद चौगुले साहेब तसेच कागलचे तहसीलदार मा.अमरदीप वाकडे साहेब यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)आणीआंबेडकर वादी जन आंदोलन च्या वतीने व्यापक सिष्टमंडळ रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मा.सतिश माळगे(दादा) यांच्या नेतृत्वाखालील भेटले.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करत महसूल ची कामे तसेच मागासवर्गीयांच्या कामांची अडवणूक करू नका आणि जर कोणी करत असेल तर रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही जनतेची कामे वेळेत पुर्ण झाली पाहिजेत अन्यथा रिपब्लिकन पक्ष हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभे करेल याची नोंद घ्यावी असे सतिश माळगे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना ठनकावून सांगितले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बाळासाहेब कांबळे,कागलचे नेते बाबासाहेब कागलकर,राधानगरी चे नेते कुंडलीक कांबळे,राहूल कांबळे,अनिल शिंगे,दत्ता कांबळे,दिपक कांबळे,संग्राम खैरे सह कागल तालुक्यातील आंबेडकरवादी तसेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.*