कागल ( एम.डी.कांबळे )दि.२४ : शहरांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कागल शहरातील जयसिंगराय तलाव परिसरातील पाणलोट क्षेत्रात १५०० झाडांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांतून कौतुकास्पद ठरला असून, भविष्यासाठी हरित वारसा जपण्याचे सकारात्मक पाऊल ठरले आहे.या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. भैय्यासाहेब माने, मा. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादी काँग्रेस कागल शहराध्यक्ष श्री.संजय चितारी, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सोनुले, युवा नेते नवाज मुश्रीफ, अमित पिष्टे, पंकज खलिफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.