कागल : बस्तवडे गावचे आयु.लखन कांबळे याना त्यांच्या सामजिक व राजकीय कामाचा आढावा घेऊन ए. डी.फौंडेशन यांच्या वतीने भारतरत्न .डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कमी वयामध्ये सामजिक आवड निर्माण करून त्या माध्यमातून लोकांची अडचण दूर करणे,आरोग्य शिबीर ,डोळे तपासणी शिबीर,शासकीय योजना राबिवणे,2019 च्या महापूरा मध्ये स्वतः पुढे होऊन पूरग्रस्त लोकांना गरजेच्या वस्तू पुरवणे ,अश्या विविध प्रकारे सामजिक कामे ते करत आहेत तसेच ते महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे विश्वासू समर्थक आहेत .दि.26 जुलै रोजी ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन पिंपरी स्टेशन पुणे येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाला.