Homeसामाजिकसार्वभौमिक मानवाधिकार परिषद जिल्हाध्यक्षपदी निवड : नामदेव कोथळीकर यांचा जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे...

सार्वभौमिक मानवाधिकार परिषद जिल्हाध्यक्षपदी निवड : नामदेव कोथळीकर यांचा जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी): सार्वभौमिक मानवाधिकार परिषदाच्या जिल्हाध्यक्षपदी नामदेव कोथळीकर यांची निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्यांची विशेष भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले. या प्रसंगी दादा यांनी कोथळीकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि भावी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. कोथळीकर यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार जागृती आणि सामाजिक कार्यास नवी दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे, कागल तालुका सरचिटणीस सचिन मोहीते , आण्णासो आवळे , विजय काळे सर ,विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि मानवाधिकार परिषद सदस्य उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular