Homeकोल्हापूर शहर /जिल्हावारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे-मांगले बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली

वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे-मांगले बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली

बच्चे सावर्डे / वार्ताहर दि.२९ : बच्चे सावर्डे परिसरात पावसाने जोर धरले असून वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, सावर्डे-मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.वारणा नदीवरील बच्चे सावर्डे-मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर-सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक बंद झालीआहे.

यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळीव पावसाचा जोर सुरु असून जूनपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे-मोठे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे. नदीकाठची शेती, पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular