Homeसांस्कृतिककागलमध्ये महिलांसाठी फ्री मेकअप व ब्युटी सेमिनार उत्साहात संपन्न.

कागलमध्ये महिलांसाठी फ्री मेकअप व ब्युटी सेमिनार उत्साहात संपन्न.

कागल ( एम. डी.कांबळे प्रतिनिधी):माऊली महिला विकास संस्था यांच्या सहकार्यातून Glitz N Glamour व Fatima Fiza यांच्या वतीने महिलांसाठी खास फ्री मेकअप व ब्युटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम ना. हसनसो मुश्रीफ सांस्कृतिक हॉल, श्रमिक वसाहत, कागल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. अमरिन नविदसो मुश्रीफ (वहिनी) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

या सेमिनारमध्ये प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट फिजा हिरोली यांनी मेकअप सत्र, उत्पादन ज्ञान, दैनंदिन त्वचेची निगा राखण्याच्या टिप्स आणि रोजच्या लूकसाठी सोपा मेकअप रूटीन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सौ.अमरिन मुश्रीफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, सौंदर्य व स्वच्छतेसंबंधी जागरूकता ही केवळ दिसण्यापुरती नसून आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट असल्याचे सांगितले.

वैशाली नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अशा प्रकारचा लाईव्ह मेकअप सेमिनार साधारणपणे मुंबई व पुणे येथे घेतला जातो आणि एका व्यक्तीसाठी दिवसाचे सात हजार रुपये शुल्क आकारले जाते. तरीही, मुश्रीफ कुटुंबीयांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित केला, हे खरंच आमच्यासाठी गोल्डन चान्स आहे.”सेमिनारला सुलोचना पिष्टे, समिना मुल्लाणी, अश्विनी सणगर, अमिना शादिवाण, शुभांगी चौगुले, विद्या पोळ तसेच कागल व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले व अशा उपक्रमांमुळे महिलांना सौंदर्य, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत आवश्यक ज्ञान मिळते, असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular