गडहिंग्लज दि.10 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आज रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी गडहिंग्लज येथे मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. सकाळी ठिक १०.०० वाजता झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नावेद मुश्रीफ व प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भूषविले.तर प्रमुख वक्ते अजिंक्य भाऊ चांदणे सो हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण करून देत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले की,“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते समाजमन समजून घेणारे आणि समाजाला दिशा देणारे क्रांतिकारक होते. त्यांच्या साहित्याने उपेक्षित, शोषित, वंचित घटकांना आवाज दिला. आज त्यांच्या विचारांची आणि कार्याची गरज अधिक तीव्रतेने भासत आहे. सामाजिक एकतेचा, समतेचा आणि संघर्षाचा संदेश त्यांनी आपल्या लेखणीतून दिला आहे. त्यांच्या विचारांवर चाललो, तर खरी लोकशाही रुजवता येईल.”असे ते म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे , मातंग आघाडी गडहिंग्लज तालुका अध्यक्ष अप्पू मांग , मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे, कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, किरण अण्णा कदम (माजी उपनगराध्यक्ष, न. प. गड.),मा. रामगोंडा उर्फ गुंडू पाटील (शहर अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस)मा. संग्राम सावंत (मुख्य संघटक, सर्विधान चळवळ) , बाबुराव आयवाळे (बहिरेवाडी) ,शरद लोखंडे (बहिरेवाडी), अमित ऐवाळे (बहिरेवाडी),विजय दावणे (करंबळी), उमेश साठे (हसुरचंपू), रेखा राजमाने (हिटणी), आप्पासो मांग (निलजी), महेश सलवादे (जिल्हा उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस),मा. परसू हुल्ले (महागांव मा. तानाजी दावणे (गजरगांव) सागर हेगडे (हरळी) ,दिपक लोखंडे (आजरा),मा. बापू अनावरे (भादवणवाडी), मारुती अनावरे (भादवणवाडी), सागर मांग (कडगांव), हारुण सय्यद (माजी नगरसेवक, न. प. गड.),अजित दावणे (दुङगे), भिकाजी घाटगे (मुम्मेवाडी), कल्लाप्पा ऐवाळे (येणेचवंडी), पांडू दावणे (करंबळी), प्रकाश जामुणे (नूল), विशाल ऐवाळे (यरणाळ),मा. सौरभ ऐवाळे (यरणात), मनोहर दावणे (दुङगे),मा. रमेश मांग (भडगांव),मा. पी. डी. कांबळे (चंदगड), जिवाळे कांबळे (चंदगड), महेश आयवाळे (करंबळी), साधना ऐवाळे (हरळी), दत्ता ऐवाळे (हरळी), राजू अनावरे अध्यक्ष, किरण म्हेत्री उपाध्यक्ष, मंजुनाथ भोसले सचिव अमित गुंठे खजिनदार,किशोर गुंठे, भरत गुंठे, मल्लेश आयवाळे, काशिनाथ गुंठे, महादेव गुंठे, गणपती गुंठे, दुंडाप्पा वालीकर, विठ्ठल नागरपोळे, गोविंद गुंठे, आप्पासाहेब गुंठे, दंडाप्पा चिनापगोळ, रेवाप्पा गुंठे, बसवराज माने, आप्पासाहेब आयवाळे, गंगाधर गुंठे, संजय हुल्ले, रविंद्र गुंठे, महादेव भोसले, संजय कासारीकर, अशोक कांबळे, प्रकाश कांबळे, दयानंद गुंठे, संभाजी गुंठे, युवराज मांग, विजय मांग, शिवराज भाटे, गंगाधर वालीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते…