पुणे (प्रतिनिधी ) दि.१२ : संघटनेच्या पदाधिकारी व सर्व शिक्षणसंचालक, सहसंचालक यांची शालेय शिक्षण मंत्री नाम.दादाजी भुसे व प्रधानसचिव रनजित सिंह देओल यांचे सोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे.
1. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी दि. ०७.०८.२०२५ च्या शा.नि. व्दारे गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी.
2. विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये. 3. शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे.
4. अतिरिक्त कामांचा ताण, वेळे व्यतेनिरिक्त होणाऱ्या V.C. याबाबतही चर्चा झाली.वरील सर्व मागण्याबाबत मा. मंत्री महोदय व मा. प्रधानसचिव महोदय यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहे.संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल,तसेच संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन मा.शालेय शिक्षण मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदय यांनी दिलेले आहे. त्यामुळे संघटनेचे दि. ०८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेले सध्याचे बेमुदत सामुहीक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
यापुढे अशप्रकारची विनाचौकशी नियमबाह्य पद्घतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल. त्यामुळे सर्व शिक्षणसेवा राजपत्रीत अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार दिं. १३.०८.२०२५ पासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संधाच्या वतीने करण्यात येत आहे.संघटनेचे हे ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघ, अराजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना, सर्व लोकप्रतिनिधी, शिक्षक- शिक्षकेतर संघटना अशा विविध संघटनांचे,मा.आयुक्त शिक्षण श्री.संतिंद्रप्रतापसिंह व मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी मान्यवरांचे, सर्व पदाधिकारी व सर्व सन्माननीय सदस्यांचे तसेच प्रसारमाध्यमांचे मनापासून खूप खूप धन्यवाद!