Homeशैक्षणिकतात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीचा अभिमान – तीन कॅडेट्स NDA लेखी परीक्षेत यशस्वी

तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीचा अभिमान – तीन कॅडेट्स NDA लेखी परीक्षेत यशस्वी

कोल्हापूर माझा ( जगदीश शिर्के ) दि. ०९ : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित,तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी, विनयनगर नवे पारगाव(ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या सैनिकी शाळेतील आज पुन्हा एकदा यशाच्या नव्या शिखरावर पोहोचली आहे.

सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या NDA (राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी) लेखी परीक्षेमध्ये या शाळेतील तीन कॅडेट्सनी यश संपादन करून संपूर्ण शाळेचा, पालकांचा आणि जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट श्लोक राऊत कॅडेट नील जाधव कॅडेट साहिल मोरेयांचा समावेश आहे.ही तिन्ही मुले शिस्त, परिश्रम आणि देशप्रेम यांचे प्रतीक ठरली आहेत. त्यांचे यश हे केवळ व्यक्तिगत नाही तर संपूर्ण शाळा परिवाराच्या समर्पणाचे फलित आहे.या उत्कृष्ट कामगिरीमागे शाळेचे कमांडंट कर्नल राजेंद्र पाटील, प्राचार्य प्रा. चंद्रकांत राजे, तसेच NDA समन्वयक डॉ. प्रवीण आर.पी.पाटील यांचे सखोल मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रेरणा लाभली. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या विद्यार्थ्यांना अखंड पाठबळ दिले.

तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी ही कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अशी मान्यताप्राप्त सैनिकी शाळा असून, येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चारित्र्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा यांचे संस्कार दिले जातात. शाळेचे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक यश नव्हे तर “राष्ट्रासाठी योग्य नागरिक घडविणे” हे आहे.आणि या यशाने ते सिद्ध करून दाखवले आहे.कॅडेट्स श्लोक, नील आणि साहिल यांनी दाखवून दिले की, “जर निर्धार प्रबळ असेल, तर यश आपोआप मार्ग शोधते.” त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळेत, पालक वर्गात आणि परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.शाळेचे कमांडंट कर्नल राजेंद्र पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले,

NDA ही फक्त परीक्षा नाही, तर ती ध्येयाच्या दिशेने पहिले पाऊल असते. आमचे कॅडेट्स देशसेवेच्या या प्रवासात यशस्वी होत आहेत, हे आमच्यासाठी अभिमानाचे आणि प्रेरणादायी आहे. प्राचार्य चंद्रकांत राजे यांनीही सांगितले,शिस्त, मेहनत आणि सातत्य या तीन गुणांच्या जोरावर आमचे विद्यार्थी आज जे यश मिळवले आहे, ते इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थी एनडीए व इतर संरक्षण सेवेतील स्पर्धांमध्ये यश मिळवतील, असा आम्हाला विश्वास आहे.तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सतत विद्यार्थ्यांमध्ये ‘देशसेवेची जाज्वल्य भावना’ जागृत ठेवते. हे यश त्या प्रयत्नांचा सुवर्णअध्याय ठरला आहे.

यशस्वी विद्यार्थी यांना संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.आम.विनयरावजी कोरे (सावकर) व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कार्जिनी यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular