Homeमहाराष्ट्र राज्य... तर काळी दिवाळी साजरी करणार : खंडेराव जगदाळे

… तर काळी दिवाळी साजरी करणार : खंडेराव जगदाळे

कोल्हापूर माझा वृत्तसेवा दि. १० : निधी मंजूर असताना देखील वाढीव टप्प्यानुसार वेतन अद्यापही मिळाले नाही. काही दिवसात दिवाळी सण आहे याचा शासनाने विचार करावा अन्यथा राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारामहाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामध्ये ०१ ऑगस्ट २०२५ पासून सर्व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु निधी मंजूर असताना देखील वाढीव टप्प्यानुसार वेतन अद्यापही मिळाले नाही. काही दिवसात दिवाळी सण आहे याचा शासनाने विचार करावा.

शासनाने वाढीव टप्पा वेतन २० ऑक्टोबर २०२५ रोजी पर्यंत निधी न दिल्यास दिवाळी दिवशी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular