दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित!दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बंधनकारक केली आहे. या परीक्षेतून कार्यरत शिक्षकांना तात्काळ सूट द्यावी, शिक्षणाचा अधिकार कायद्यात आवश्यक सुधारणा कराव्यात तसेच शिक्षकांसाठी वेळोवेळी रिफ्रेशर कोर्स आयोजित करावेत— या प्रमुख मागण्यांसाठी आयफेटोच्या वतीने आज 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन संपन्न झाले.

या आंदोलनात पुढील मागण्या जोरदारपणे मांडण्यात आल्या—
• सर्व शिक्षकांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी.
• आठवा केंद्रीय वेतन आयोग तातडीने गठित करून 1 जानेवारी 2026 पासून लागू करावा.
• नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत 50% महागाई भत्ता (DA) मूलभूत वेतनात मर्ज करावा.
• निवृत्त शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अधिनियम 2025 मधील कलम 149 आणि 150 रद्द करावीत.
• केंद्रीय विद्यालयांना मिळणाऱ्या सर्व सुविधा सर्व सरकारी शाळांना द्याव्यात.
• KG ते PG पर्यंतचे संपूर्ण शिक्षण सरकारी अनुदानातून व सरकारी व्यवस्थेमधून दिले जावे.
• शिक्षणाचे खाजगीकरण आणि व्यापारीकरण (बाजारीकरण) थांबवावे.
• समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे.
• सर्व शिक्षण सेवक, कराराधारित व अंशकालिक शिक्षक यांना स्थायी करून जुनी पेन्शनही लागू करावी.
केंद्र सरकारने आपल्या एकूण बजेटपैकी 10% शिक्षणावर तर प्रत्येक राज्याने 30% शिक्षणावर खर्च करावा.आंगणवाडी व बालवाडी यांना प्राथमिक शिक्षणाशी जोडावे.शिक्षणाचा अधिकार कायदा 0 ते 18 वर्षे वयोगटापर्यंत लागू करावा.शिक्षकांकडून सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे पूर्णपणे बंद करावीत.सर्व राज्यांतील शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणेच समान वेतन व भत्ते देण्यात यावेत.उद्योगपतींना करात दिलेली सुट रद्द करून ते पैसे शिक्षण क्षेत्रावर खर्च करावेत.आंदोलनादरम्यान—“टीईटीची जबरदस्ती बंद करा”, “जुनी पेन्शन लागू करा”, “शिक्षण वाचवा – देश वाचवा”, “टीईटीचा मार – नाही सहन करणार शिक्षक परिवार”, “शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा”, “GDP चा दहा टक्के शिक्षणावर खर्च करा”, “शिक्षकाला शिकवू द्या – देशाला वाढू द्या” अशा जोशपूर्ण घोषणा देण्यात आल्या.हे आंदोलन आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, राष्ट्रीय सचिव व्ही. अण्णामलाई, संरक्षक हरीमंदिर पांडे, कोषाध्यक्ष शालिकराम पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

या आंदोलनात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमधून हजारो शिक्षक प्रतिनिधी सहभागी झाले.आंदोलनात राष्ट्रीय उपाध्यक्ष राम अवध यादव, चंदना चक्रवर्ती, राममूर्ती स्वामी, सचिव धनंजय नायक, टी.पॉल रेड्डी, पी. रामन्ना रेड्डी,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महासचिव राजन कोरगावकर, दादा जांभवडेकर, बाबासाहेब लाड, संजय पाटील, संजय कडगावे, वसंत आडके, उत्तम गुरव, संतोष कदम,आर.के.पाटील, प्रकाश पाटील, उमर जमादार, प्रकाश सुर्यवंशी तसेच विविध राज्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Users Today : 20
Total Users : 12794
Views Today : 63
Total views : 17177