▪️ देवळा (चंद्रशेखर कापसे) कसमादे पट्ठयातील सदैव आवर्षणग्रस्त देवळा तालुक्यातील गेल्या पन्नास वर्षाच्या मागणी असलेल्या मेशीकरांच्या शेती पाणी प्रश्नाला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणाऱ्या चनकापूर कालव्यातून नागिन नाला पोटचारी द्वारे मेशी धोबीघाट लघुपाट बंधाऱ्यात टाकल्या जाणाऱ्या एकूण १८ कोटी किमतीच्या ९ कि मी लांबीच्या २ मीटर त्रिज्या असलेल्या बंदिस्त पाईप लाईन पाणीचारीचे उदघाटन देवळा चांदवड मतदारसंघांचे पाणीदार आमदार डॉ.राहुल दादा आहेर व माजी जिल्हा परिषद सदस्य जलदूत चंदूदादा (प्रशांत) देवरे यांच्या उपस्थितीत आज सांयकाळी ४:०० वाजता देवळा मालेगाव राज्यमार्गावरील मेशी शिव हद्दीवर मेशी पिंपळगाव करांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
सदैव अवर्षणग्रस्त दुष्काळाची चटके सोसणारा देवळा तालुका अशी ओळख परिधान केलेल्या त्यातील गिरणाकाट खोऱ्या लगत असलेल्या मेसी परिसराच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हा एक येथील विवाहा इच्छुक मुलांच्या लग्नासाठी मेशी येथे मुलगी देताना मुलीकडील लोकांकडून खमंगपणे काल-परवापर्यंत चर्चिला जात होते त्याच जगदंब नगरीला ज्या प्रकल्पामुळे पाणीदारपणा निर्माण होणार आहे मेशीचा कायमचा शेती पाण्याचा दुष्काळ संपणार आहे अशा धोबीघाट लघु पाटबंधाऱ्यात तब्बल पन्नास वर्षाच्या मागणीला आज खऱ्या अर्थाने परिपूर्णता येत आहे ते म्हणजे मतदारसंघाचे पाणीदार कार्यसम्राट आमदार डॉ राहुल दादा आहेर यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी धोबीघाट लघु पाटबंधारे पाणी प्रश्न सोडवण्याचे स्वप्न बघितलेलं होतं ते जलदूत माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू दादा देवरे ह्या महान धुरीनांच्या अथक प्रयत्नातून नागिन नाला पोट चारीच्या नऊ किलोमीटर लांबीच्या तसेच दोन मीटर त्रिज्यांच्या बंदिस्त पाईपलाईन चारीचं आज सायंकाळी ४:०० वाजता देवळा मालेगाव राज्य महामार्गावरील मेसी हद्दी वर या 18 कोटी खर्चाच्या कामाचे उद्घाटन आज आमदार आहेर यांच्या हस्ते होत आहे हा मेशी जगदंब नगरीच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाचा सोनेरी दिवस आहे धोबीघाट लघु पाटबंधारे प्रकल्प १ ची निर्मिती १९६८ मध्ये उमराण्याचे आणि निबोळयाचे नव्हे तर कसमादेचे डाण्यावाघ म्हणून जिल्हा परिषद चे अध्यक्ष म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख होती ते कर्मवीर ग्यानदेव दादा देवरे व त्याच 1968 मध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व गिरणा काठचा पाणीदार पुढारी म्हणून ज्यांची ओळख होती ते दिवंगत लोकनेते लालजी आप्पा पाटील या दोन पाणीदार नेतृत्वांच्या अथक प्रयत्नातून चार पाझर तलावासह धोबीघाट लघु-बंधारे ची निर्मिती झालेली आहे आणि त्याचवेळी गिरणा नदीवर ठिकठिकाणी लघुबंधारे पाणीदार नेतृत्वामुळे निर्माण झालेले आहे. हे येणाऱ्या पिढीला देखील कळणे गरजेचे आहे .
धोबीघाट लघु बंधाऱ्याची १९६८ ला कामाची सुरुवात होऊन ते काम १९७२ च्या दुष्काळात पूर्ण झाले. धोबीघाट लघु बंधाऱ्याची निर्मिती व्हावी म्हणून तत्कालीन सरपंच चिंधा पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये या धरणाची निर्मिती झाली १९६८ ते ७२ पर्यंत प्रचंड दुष्काळाची परिस्थिती असल्याने गावकऱ्यांना व शेत मजुरांना कामे नव्हतं त्यावेळी शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शेतमजुरांचे नेतृत्व करणारे लोकपत्रकार एकनाथ दादा कापसे आणि महादू गिरी बोरसे बंडा आप्पा खैरनार शिवाजी गोबजी बोरसे नामदेव फुला बोरसे आनंदा चव्हाण नामदेव पाटील बाबूलाल पुंजू दशपुते नथू दाजी पाटील या दिवंगत नेतृत्वासह माजी सरपंच अंबादास गणपत कापसे या शेती पाण्यासाठी सदैव पाठपुरावा करणाऱ्या नेतृत्वांच्या डरकाळी मुळेच धोबीघाट धरणासह इतरही तीन बंधाऱ्यांची वनीकरणासह त्यावेळी निर्मिती झाली आणि ज्या धोबीघाट धरणाची खऱ्या अर्थाने निर्मिती कसमादेचे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केले त्या ग्यानदेव दादा देवरे आणि कै लालजी आप्पा पाटील या पाणीदार पुढार्यांमुळे या धरणांची निर्मिती झाली त्याच धरणाची आज शेतीपाण्याची तहान भागवण्याची स्वप्नपूर्ती ग्यानदेव दादांचे नातू प्रशांत दादा देवरे यांच्या प्रयत्नातून पूर्ण होत आहे हा एक खरोखरच योगायोगच म्हणावं लागेल.आजोबांनी धरण बांधलं आणि धरण भरण्याचं कार्य आज चंदू दादांच्या रूपाने नातू पूर्ण करत आहे तसेच धोबीघाट धरणात पाणी टाकण्याचे स्वप्न माजी आरोग्य मंत्री डॉ.दौलतराव आहेर यांनी 1995 मध्ये बघितलं आणि त्याची स्वप्नपूर्ती आज त्यांचे चिरंजीव आणि एक मतदारसंघाचे पाणीदार आमदार म्हणून डॉ राहुल आहेरांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल.
धोबीघाट लघु बंधाऱ्यात गिरणा उजवा कालव्याचे पाणी टाकण्यात यावं ही एक हक्काची मागणी 1996 मध्ये पहिल्यांदा देवळा येथील जनता दरबारात तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.डी एस. बाबा यांच्याकडे त्या वेळचे मेशी भाजपाचे पहिल्या फळीतील नेतृत्व श्री शरद मामा बच्छाव के.टी पाटील कै.पांडू ड्रायव्हर शिरसाट आणि युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार चंद्रशेखर कापसे शिव सेनेच्या वतीने रवींद्र लांडगे भाऊसाहेब लांडगे व सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ भामरे पत्रकार कै.एकनाथ कापसे,उखा नाना बच्छाव यांच्या माध्यमातून केदा अण्णा शिरसाट यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतून डी.एस बाबांच्या व पाटबंधारे विभागाचे अभ्यास असलेले डेप्युटी इंजिनियर किशोर सूर्यवंशी यांच्यासमोर मांडण्यात आली होती आणि अवघ्या महिनाभरात दिवंगत किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली गिरणा डावा कालवा ते धोबीघाट लघुबंधारे या पोट चारीचा सर्वे देखील डी एस बाबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर पाणी प्रश्नाचा अभ्यास असलेले के.टी पाटील शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने नागीण नाल्याचा पोट चारी प्रश्न पुढे आला आणि आज त्याच नागिन नाला भूमिगत पोट कालव्याच्या निर्मिती साठी तब्बल तीन टर्म च्या प्रतिक्षे नंतर आमदार राहुल आहेर यांच्या माध्यमातून १८ कोटींचा निधी मंजूर करून तहानलेल्या मेशीकरांच्या शेती पाणी प्रश्नाच्या पोटचारी उद्घाटनाच्या माध्यमातून तब्बल पन्नास वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज ही स्वप्नपूर्ती होत आहे हा आजचा क्षण जगदंब नगरीच्या इतिहासातील एक सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा दिवस आहे आणि तो सोनेरी अक्षरात लिहिण्याचं भाग्य आमदार आहेरांच्या माध्यमातून आणि जीवाचं रान करून ज्यांनी हा प्रकल्प परिपूर्ण करण्याचं स्वप्न बघितलं ते जलदूत चंदू दादा देवरे यांच्या साक्षीने लिहिला जात आहे.हे जगदंब नगरीच्या दुष्टीने महाभाग्याचा दिवस समजता येईल.
धोबीघाट लघु बंधाऱ्याची पाणी क्षमता फार मोठी असल्याने येथे शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी कायमच आरक्षण लागू केले गेले तर यातुन मेशी डोंगरगाव यासह दोन हजार एकर शेती क्षेत्राला पाणी पुरवठा होऊन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणार असल्याने मेशी-डोंगरगाव परिसराचे हिरवे स्वप्न यातून पूर्ण होणार आहे असे मत पंचायत समितीचे माजी.उपसभापती के.टी. पाटील शिरसाठ व डोंगरगाव चे माजी सरपंच दयाराम सावंत यांनी व्यक्त केले आहे. *विकास योजनांचे लोकार्पण* मेशी येथे नुकतेच आ.आहेर यांच्या २५ लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे उदघाटन तसेच मेशी वासोळ या ६ कि मी लांबीच्या मुख्यमंत्री सडक योजनेतील ८०२.६० लक्ष रुपयांचे कॉंक्रिटीकरण कामाचं लोकार्पण आमदार आहेर यांच्या हस्ते आज पाच वाजता जगदंब नगरी मेसी येथे संपन्न होत आहे या वासूळ मेसी मार्गाच्या काँक्रिटीकरण नवनिर्मितीसाठी पत्रकार चंद्रशेखर कापसे व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ चव्हाण आप्पा कुलकर्णी यांच्या माध्यमातून आमदार आहेर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आणि ह्या पाठपुराव्याला अवघ्या दोन वर्षात न्याय देऊन आमदार आहेर यांनी भरघोस निधी मंजूर करत सटाणा मनमाड शिर्डी अशा एका जलद गती नव्या मार्गाला उत्तेजन देऊन सटाणा कडून मनमाड शिर्डी जाण्यासाठी एक शॉर्टकट व वेळ वाचवणारा मार्ग आमदार राहुल आहेर यांनी निर्माण करून दिला आहे या मार्गाला अधिकाधिक गतिमान करण्यासाठी राज्य महामार्गाचा दर्जा मिळण्यासाठी आमदार आहेर व जलदूत चंदू दादा देवरे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी गिरणा काठ खोऱ्यातून केली जात आहे. तसेच महालपाटणे धोबीघाट या ८ कि मी मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीट करण कामाचे देखील पाठपुरावा करून या मार्गाचे नूतनीकरण करण्यात यावे तसेच डोंगरगाव मेशी आणि मेसी फाटा तर मेशीगाव या एकूण नऊ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण करण्याचे काम देखील आमदार आहेर यांच्या माध्यमातून हाती घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.




