Homeशैक्षणिकशिक्षकांच्या पगारावर गदा आणल्यास तीव्र आंदोलन उभारू : दादा लाड यांचा इशारा

शिक्षकांच्या पगारावर गदा आणल्यास तीव्र आंदोलन उभारू : दादा लाड यांचा इशारा

कोल्हापूर दि. २७ : शिक्षकांच्या हक्काच्या पगारावर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही, प्रसंगी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा शिक्षक नेते व पुणे विभाग शिक्षक भारतीचे अध्यक्ष दादा लाड यांनी दिला.

लाड पुढे म्हणाले,पुणे येथे झालेल्या शिक्षण संस्था महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांच्या पगारातून पाच टक्के रक्कम कपात करण्याचा ठराव करणेत आला. महाराष्ट्राच्या शिक्षणपरंपरेला कलंकीत करणारा हा ठराव असून तो मांडणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करतो.संस्थाचालकांनी लढा उभारून शासनाकडे वेतन्नेतर अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे .शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवून संस्थाचालक शाळा व शिक्षक यांचेकडे पैसा मिळविण्याचे साधन म्हणून पहात आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या योगदानातून खेड्यापाड्यातील झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहचली. त्यांनी  शिक्षणक्षेत्राकडे सेवा म्हणून  पाहिले, त्यांचा आदर्श संस्थाचालकांनी घ्यावा असे आवाहनही लाड यांनी केले.

ते पूढे म्हणाले,शिक्षण दर्जेदार होणेसाठी आजकाल शिक्षक स्वतःच्या पगारातील काही रक्कम विविध शालेय कामकाजासाठी खर्चव करत असतात.सध्या अनेक मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षकपदे रिक्त आहेत. पोर्टल द्वारे राबविल्या जाणारी भरती प्रक्रिया ही अतिशय संथ गतीने कार्यरत आहे. यामुळे ज्या शाळेत शिक्षकसंख्या कमी आहे अशा शाळांतील उर्वरित शिक्षक स्वत:च्या पगारातून वर्गणी काढून मानधन तत्वावर तात्पुरते शिक्षक नेमून शाळेची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.शाळेमध्ये अनेक भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देणेसाठी अनेक शिक्षक स्वतः पगारातून निधी उभारून खर्च करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular