कागल ( एम.डी.कांबळे ) :1 ऑगस्ट 1917 रोजी स्थापन झालेली व्हनाळी शाळा.आज 109 वर्षे झालीत.ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती व शाळा यांचे मार्फत अतिशय उत्साही वातावरणात वर्धापन दिन साजरा केला. सावित्रीबाई फुले व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व केक कापून वर्धापन दिन साजरा केला.

मुलांना गोड खाऊ वाटप करण्यात आले.शाळेचे माजी शिक्षक दिनकर वाडकर गुरुजी यांनी शाळा स्थापनेचे काही अनुभव सांगितले. माजी डे.सरपंच ओंकार कौंदाडे यांनी शुभेच्छा दिल्या.अध्यापक एम्.आर.गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी उपस्थित सरपंच दिलीपराव कडवे, डे.सरपंच सौ अश्विनी राजेंद्र जांभळे. शा. व्य.समिती अध्यक्ष दिपक हातकर ,उपाध्यक्ष रविंद्र पाटील,सदस्य राजू सुतार, जया पाटील,मयुरी पाटील, ग्रा. पं.सदस्य पोपट वाडकर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासो खामकर यांनी केले.आभार अध्यापक भिकाजी संकपाळ यांनी मानले.