पुणे दि.११ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्राच्या शिक्षणइतिहासात नोंदला जाणारा क्षण. सत्ताधाऱ्यांनी आता धोरणांचा फेरविचार न केल्यास, या आंदोलनाचे पडसाद पिढ्यान्पिढ्या उमटतील. हा दिवस शैक्षणिक व्यवस्थेच्या आत्मपरीक्षणाचा आहे.शिक्षण अधिकारीच असुरक्षित तर पुढील पिढी कोणाच्या भरोशावर?
महाराष्ट्राच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांनी आता धोरणांचा पुनर्विचार करायलाच हवा.महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत प्रथमच, विद्येच्या माहेरघरात अभूतपूर्व आंदोलनाचा साक्षीदार बनले शिक्षणविश्व व मध्यवर्ती इमारत. आजपर्यंत न झालेली वेळ अखेर आली; शिक्षण-प्रशासकांच्या मनातील वेदना आणि प्रश्न मांडणारा हा ऐतिहासिक क्षण, राज्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक गंभीर वळण ठरतो आहे.शिक्षणाच्या पवित्र मंदिरात भीतीचे वातावरण. जर आज शिक्षण अधिकारीच सुरक्षित नसतील, तर उद्याच्या महाराष्ट्राला कोण मार्गदर्शन करणार?